मुंबई : व्यसन मुक्ती परिषद महाराष्ट्रतर्फे यावर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कार २०२४ धमलेश अनिरुद्ध सांगोडे यांना जाहीर झाला आहे. धमलेश सांगोडे हे भंडारा येथील हितेंजु संस्थेचे संस्थापक आहेत. त्यांच्या व्यसनमुक्ती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार सोहळा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, वाय. वी. सेंटर, मंत्रालय समोर सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जिरवाड, माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी परिवहन मंत्री अनिल परब, तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
व्यसन मुक्ती परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अंजली पाटील, कोषाध्यक्ष शिरीष वडजे पाटील, पुरस्कार निवड समिती प्रमुख डॉ. राजकुमार गवडे आणि व्यसनमुक्ती परिषद महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रा. आजिनाथ शेरकर यांनी पुरस्काराची घोषणा केली.