• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, February 9, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, February 9, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

समाजातील प्रत्येकालाच मानसोपचाराची गरज : राजन खान

NGO ख़बर by NGO ख़बर
May 24, 2023
in सामाजिक उपक्रम
0

पुणे : काही प्रमाणात आपण सर्वच मनोरुग्ण असतो आणि आपल्यातील प्रत्येकालाच मानसोपचाराची गरज असते असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक राजन खान यांनी परिवर्तन संस्थेच्या किरण गटाने आयोजित केलेल्या रंग मनाचे या कार्यक्रमात केले. जागतिक स्किझोफ्रेनियादिवसाच्या निमित्ताने या आजाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्किझोफ्रेनिया आजाराचा सामना करत असलेल्या मुलामुलींनी या कार्क्रमात गाणी, कविता, नृत्य यांचे बहारदार सादरीकरण हे केले. ज्येष्ठ लेखक राजन खान व रंगकर्मी अतुल पेठे हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात पुढे बोलताना राजन खान म्हणाले कि, जगाशी जुळवून न घेता येणं म्हणजे वेड असते, व ते आपल्या सर्वात असते. एकमेकांवर विश्वास नसणं, दुसरा माणूस आपल्या पेक्षा कमी दर्जाचा असल्याची भावना ठेवणं आणि माणसा माणसात भेद करणे यामुळेच मानसिक अस्वस्थता आणि मानसिक आजार वाढत जातात. बुवा, बाबा, यांच्या नादाला लागू नका. सदोष स्पर्धा तुम्हाला मनोरुग्ण बनवते. जगणं महत्त्वाचं आहे का फक्त शिक्षण महत्त्वाचं? जगण्याच्या मागे वेड्यासारखं धावणं महत्त्वाचं…जिंकण्या हारण्याचे भेद जेथे तीव्र होतात तेथे मनोरुग्ण बनतात. त्यामुळे आपण आपणातले भेद कमी करू या. आपण जिवंत आहोत याचा आनंद साजरा करणं महत्त्वाचं. रुग्ण असणे हे पाप, वाईट नाही ते निसर्गाचे देणे आहे. वेदना असतील तर उभे राहावे. गाणं, नाचणे यातील नाद जगायला प्रोत्साहित करते. म्हणून मानसरंगचा आजचा कार्यक्रम मला महत्त्वाचा वाटतो.

अतुल पेठे म्हणाले, “अशा प्रकारच्या कार्यक्रमातून कौशल्य विकास करून आत्मविश्वास वाढवणे हे एक ध्येय असते. त्यामुळेच याआधी केलेले मानसरंग नाटय महोत्सव सारखे प्रयोग महत्त्वाचे ठरतात. बिघडलेल्या समाजाची मनस्थिती लेखकाला कळते. साहित्यातून सजग, संवेदनशील बनवणे तसेच भिंती तोडायचे काम लेखक, कलाकार, डॉकटर व इतरांचे असते. त्यामुळे मानसिक आरोग्य किंवा मानसिक आजारांसारख्या संवेदनशील विषयांची कोंडी फोडण्यासाठी कला हे उत्तम माध्यम आहे.”

विविध तीव्र स्वरूपाच्या मानसिक आजारांशी यशस्वीपणे सामना केलेल्या मानसमित्रांनी आपले अनुभव आणि संघर्षाची कहाणी सर्वांना सांगितली. डॉ. हमीद दाभोलकर यांनी या सत्राचे प्रास्तविक केले. सकाळच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा कचरे, संगीता पुरंदरे आणि सुरेश डोंगरे यांनी केले तर आभार राजू इनामदार यांनी मानले.

Previous Post

संविधान परिवाराचा कुस्तीगीर महिलांच्या आंदोलनातील न्याय मागण्यांना पाठिंबा

Next Post

R.S.S. आणि मी..!

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved