इचलकरंजी : २८ सप्टेंबर २०२४ रोजी इचलकरंजी येथील आनंदीबाई विद्या मंदिर मध्ये किशोरवयीन मुलींसाठी महत्त्वपूर्ण आरोग्य संवाद सत्र संपन्न झाले. हे सत्र समाजबंध संस्था आणि संविधान परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये वैभवी प्रेमलता संजय, कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य संवादिका यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून किशोरवयातील शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
सत्रात मासिक पाळीचे चक्र, त्यासंबंधीचे न्यूनगंड, तसेच किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबद्दलच्या समज-गैरसमज यावर मोकळ्या मनाने चर्चा करण्यात आली. मुलींनी स्वतःच्या आरोग्याविषयी अधिक जागरूक होण्याची गरज आणि मासिक पाळीशी निगडीत न्यूनगंड दूर करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फिरोजखान कनवाडे, स्नेहा दिवटे, शैलजा पाटील, आणि शाळेचे मुख्याध्यापक विलास रामाणे सर यांचे सहकार्य विशेष महत्त्वाचे ठरले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींनी सत्रामधून खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळवल्याचे सांगितले.
संपर्क: ८६२३०७१९२७