पुणे : राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त पुणे महानगरपलिका शाळा व I.C.D.S. अंगणवाडीमध्ये मुलांच्या आरोग्य सुधारणा व निरोगी आहाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पुणे महानगर पालिका,I.C.D.S. व युनायटेड वे दिल्ली संस्थेच्या सहकार्याने भाजीमंडई, सुदृढ बालक स्पर्धा , पौष्टिक आहार ड्रेस स्पर्धा, रॅली, आई-बाबा पौष्टिक आहार पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
युनायटेड वे दिल्लीच्या ‘नीव प्रकल्पा’ अंतर्गत आयोजित या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये संतुलित आहाराची सवय लावणे तसेच पालकांमध्ये पोषणाबाबत जागरूकता वाढवणे हा होता.
वरील स्पर्धेत पालकांनी व पाल्यानी स्पर्धेत सहभाग घेतला प्रथिनेयुक्त व पौष्टिक खाद्यपदार्थ सादर केले. या माध्यमातून मुलांना आरोग्यदायी आहार कसा देता येईल याबाबत नव्या कल्पना व मार्गदर्शन मिळाले. विजेता पालकांना व विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
या उपक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये योग्य आहाराचे महत्त्व अधोरेखित झाले. तसेच पोषण आठवड्याच्या निमित्ताने जंक फूडपासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.
शुभांगी चव्हाण (उप-प्रशासकीय शिक्षण अधिकारी, पुणे म.न.पा.), यांनी पालकांना मार्गदर्शन केले. आहार आणि पालकत्व यावर मार्गदर्शन केले.तसेच कार्यक्रमाला युनायटेड वे दिल्लीचे मुकुंद दुधाळे व अरुणा विचारे, युनाटेड व्हे दिल्ली टीम उपस्थित होते








