• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
Monday, February 9, 2026
NGO खबर
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
Monday, February 9, 2026
NGO खबर
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

‘एकलव्य इंडिया फाऊंडेशन’च्या पहिल्या सत्यशोधक युवा संसाधन केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न !

NGO ख़बर by NGO ख़बर
October 20, 2023
in NGO घडामोडी
0

नागपूर : उच्च शिक्षणाच्या वाटा वंचितांसाठी नेहमीच खडतर राहिल्या आहेत. आयआयएम, आयआयटी आणि परदेशातील वंचित बहुजनांचे कमी प्रतिनिधित्व लक्षात घेऊन एकलव्यने सुरू केलेली चळवळ शिक्षणातील पहिल्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा आशावाद आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचे सदस्य अनिल वागडे यांनी व्यक्त केला. एकलव्य इंडिया फाऊंडेशनच्या पहिल्या वहिल्या सत्यशोधक युवा संसाधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगावेळेस ते बोलत होते. गोरेवाडा परिसरातील पीएनआरआय याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फीत आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करून या सोहळ्यास सुरुवात झाली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचे सदस्य अनिल वागडे, माजी भारतीय रेल्वे अधिकारी अनिल रामटेके, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सल्लागार आणि भाषातज्ञ अनुराधा बेले, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूरच्या इन्फेड विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी धवड, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेचे ( NEERI) डॉ. अरविंद शाक्य आदी. मान्यवर उपस्थित होते. सध्या विविध क्षेत्रात उच्च पदावर असणारे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, पीएनआरआय सेंटर आणि एकलव्यचे मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि माजी विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीएनआरआय टीमचे सहकार्य आणि मार्गदर्शन या संपूर्ण प्रक्रियेत मोलाचे ठरले.

महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्ताने देशातील नामांकित विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षणासाठी सहा महिन्यांच्या या निवासी कोर्ससाठी १० पेक्षा जास्त राज्यातून जवळपास ६० हुन अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांना आयआयटी, आयआयएम, केंद्रीय विद्यापीठ आणि इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पात्रता परीक्षेसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचा या सेंटरचा हेतू आहे. यासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक भान, नेतृत्वक्षमता आणि कौशल्य विकास करण्यावरही या सेंटरचा भर असणार आहे.

एकलव्य मागील सहा वर्षांपासून देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमध्ये वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि शिबिर आयोजित करत आले आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या एकलव्यचे तब्बल १२०० हुन अधिक पहिल्या पिढीतील विद्यार्थी देशभरात शिक्षण घेत आहेत.

उच्च शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे या हेतूने सुरू झालेल्या एकलव्यच्या चळवळीतून अनेक पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांना बळ मिळत आहे. सत्यशोधक युवा संसाधन केंद्र देशभरातील विविध शिक्षण संस्थांमध्ये वंचित विद्यार्थ्यांचे नेटवर्क तयार करणार आहे. यासाठी तुम्हीही मदतीचा एक हात पुढे करू शकता. असे आवाहन एकलव्य चे संस्थापक अध्यक्ष राजू केंद्रे यांनी केले आहे.

Previous Post

हितेंजु संस्थेच्या वतीने “बालविवाह मुक्त भारत” अभियानाला सुरुवात

Next Post

बाल, किशोर आणि युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अराईस विश्व सोसायटी’चा “अवली” प्रकल्प !

Please login to join discussion

Categories

  • Business, Small Business (1)
  • CSR (83)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (262)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (119)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)

2

NGO Khabar

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved

Navigate Site

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

Social icon element need JNews Essential plugin to be activated.
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

©2021- 2024 NGO Khabar. All Rights Reserved