पुणे: बजाज फिनसर्व्हच्या आर्थिक सहकार्याने, युनायटेड वे दिल्ली आणि महिला व बाल कल्याण आयुक्तालय, पुणे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘NEEV’ प्रकल्पाअंतर्गत पुण्यात अंगणवाडी शिक्षकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत 58 अंगणवाडी सेविका आणि सुपरवायझर यांनी सहभाग घेतला.
युनायटेड वे दिल्ली संस्थेने पुणे महानगरपालिका हद्दीतील ५० अंगणवाडी केंद्रांमध्ये शैक्षणिक साहित्य, BALA भित्तिचित्रे आणि पायाभूत सुविधांची सुधारणा केली आहे. तसेच, पालकांचा सहभाग वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.
कार्यशाळेत गटकार्य, भाषा विकास, गणितीय संकल्पना आणि खेळाच्या माध्यमातून शिकण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण श्रीमती विजया महाडिक यांच्या नेतृत्वाखाली झाले. कार्यक्रमाला विभागीय उपयुक्त श्री. संजय माने, श्रीमती भिलारे, युनायटेड वे दिल्ली संस्थेचे श्री. मुकुंद दुधाळे, श्रीमती अरुणा विचारे आणि अंगणवाडी सुपरवायझर उपस्थित होते.








