भाकर फाऊंडेशनच्या वतीने आकाश कंदील आणि पाऊच बनवणे प्रशिक्षण संपन्न

मुंबई, गोरेगाव : दिवाळी निमित्ताने भाकर फाऊंडेशन निर्मला निकेतन कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे महिला व मुलींसाठी कापडी कंदील आणि पाऊच बनवणे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.

यावेळी गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर नंबर १ मध्ये पाउच बनवणे व भगतसिंग नगर नंबर २ मध्ये कापडी कंदील बनवणे प्रशिक्षण घेण्यात आले. निर्मला निकेतन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरात महिला आणि मुलींना आकर्षक आणि मनमोहक असे कंदील आणि पाऊच बनवायला शिकवले. या प्रशिक्षणासाठी श्री अंबाबाई मंदिर देवस्थान ट्रस्ट गोरेगावच्या वतिने मोठ्या प्रमाणात धारवाडच्या साड्या व ब्लाऊज पिस देणगी स्वरुपात देण्यात आले होते.

Exit mobile version