धुळे : हाजी कलीम शाह यांच्या स्मरणार्थ गरीब व अनाथ सर्वधर्मीय मुला-मुलींचा सामुहीक विवाह सोहळा सलग दुसऱ्या वर्षी संपन्न झाला. आमदार फारुख शाह यांच्या मार्गदशानाखाली तसेच भिकन हाजी यांच्या देखरेखीखाली झालेल्या या विवाह सोहळ्यात सोहळ्यात एकुण २५ जोडप्यांचा विवाह लावण्यात आला.
या विवाह सोहळ्यातील जोडप्यांना आमदार फारुख शाह यांच्या वतीने पलंग, गादी, कपाट, भांडी व इतर संसारपयोगी वस्तु भेट देण्यात आल्या. तसेच वधु-वरांकडील पाहुण्यांना जेवण देण्यात देण्यात आले. या जोडप्यांमध्ये महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, मनमाड, चोपडा, शहादा, शिरपुर, नंदुरबार, यावल तसेच मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, इंदोर व गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, नवसारी मधील जोडप्यांचा समावेश होता.
आमदार फारुख शाह यांनी गरीब, अनाथ मुला-मुलींचे परिस्थिती पाहून सामाजिक भावनेने एक पवित्र असे कार्य सुरु ठेवलेले असून यामुळे अनेक अनाथ, गरीब लोकांना या सामुहीक विवाह सोहळ्याचा फायदा होत आहे. या कार्यक्रमाला धुळे शहरातील माजी नगरसेवक सव्वाल अन्सारी, मुजफ्फर अन्सारी, ज्येष्ठ समाजसेवक सलाम मास्टर, फक्रुद्दीन लोहार व सर्व सन्माननीय नगरसेवक यांनी भेट देवून वधु-वरांना आशीर्वाद दिले व आमदार फारुख शाह यांच्या कामाची प्रशंसा केली.
फारुख शाह यांचे बंधु हाजी कलीम शाह ज्यांनी कोरोना काळात गरीब वंचिताना कोरोना आजाराची परवा न करता धुळे शहारातील हजारो गरीब नागरीकांना अन्न, धान्य व प्रवासी मजुरांना जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांच्या इच्छेप्रमाणे पहील्या वर्षी झालेल्या सामुहीक विवाह सोहळ्यात एकुण ३० जोडप्यांचे लग्न मोठ्या थाटामाटात संपन्न झाले होते.
हा विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी विवाह सोहळा कमिटीचे अध्यक्ष हाजी भिकन शेठ, हाजी छोटु शाह, जिल्हाध्यक्ष नासीर पठाण, हाजी सलीम शेठ, अनिस शाह, मुख्तार बिल्डर, आमीर पठाण, सउद सरदार, नगरसेवक सईद बेग, गनी डॉलर, हाजी रउफ शाह, गुलाम नबी शाह, हाजी अनिस शाह (मालेगाववाले) अन्सारी हाजी जाहीद, मौलवी शकील, छोटु हाजी मच्छीवाले, पापा सर, कैसर पेंटर, अजहर सय्यद, मजीद पठाण, रफीक पठाण, आसिफ पोपट शाह, आसिफ मुल्ला, हलीम समसुद्दीन, शोएब मुल्ला, मुश्ताक पहेलवान सउद आलम गोलू शाह, व अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले.