राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताहच्या निमित्ताने सेफ किड्स फाउंडेशन संस्थेने पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या सहकार्याने ससाणे एज्यूकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल (प्राथमिक, माध्यमिक) ससाणे नगर आणि न्यू इंग्लिश स्कूल एस आर पी एफ शाखा येथे अग्निशमन प्रात्येक्षिक दाखविण्यात आलीत. यामध्ये एकूण ८०० विद्यार्थी, ८५ शिक्षक आणि ११७ पालक सहभागी झाले होते.
राष्ट्रीय अग्निशमन सेवा सप्ताह हा १४ ते २० एप्रिल दरम्यान पाळला जातो व या वर्षीची थीम ही ‘शिका अग्निसुरक्षितता – वाढवा उत्पादकता’ अशी आहे. अग्निशमन प्रात्येक्षिक दाखविण्यामागे विद्यार्थ्यामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक आयोजित केले होतो. हे प्रात्यक्षिक प्रमोद सोनावणे स्टेशन ड्युटी ऑफिसर, हडपसर, अग्नी शमन दल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
सेफ किड्स फाउंडेशन संस्था मागील ६ वर्षापासून पुणे, पिंपरी चिंचवड व पी एम आर डी ए या परिसरात अग्नी सुरक्षा बाबत जाणीव जागृती करण्याचे काम करत आहे. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा नायर, श्रीमती भोसले तसेच संस्थेचे चेअरमन श्री. ससाणे उपस्थित होते.