पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

मुंबई-डोंबिवली : महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा, ता. अलिबाग जि. रायगड यांच्या तर्फे पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलतील स.वा.जोशी शाळेच्या परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण १०२७ सदस्यांनी तसेच नागरिकांनी सहभाग घेतला.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी निरूपणाच्या माध्यमातून  आरोग्य शिबीर, व्यसन मुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संतुलन, वृक्ष लागवड व संवर्धन स्वच्छता अभियान, विविध सरकारी दाखले वाटप, स्मशानभूमी, दफन भूमी स्वच्छता, जलपुर्नभरण, श्रवणयंत्र वाटप, पोलिसांना बॅरिअर गेट्सचे वाटप यासारखे उपक्रम करून समाज प्रभोधनाचे कार्य केले. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे सुरु ठेवताना पद्मश्री. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने रक्ताचा असलेला तुटवडा विचारात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरात डोंबिवली परिसरातील राजकीय, सामाजिक आणि शासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते व त्यांनी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या शिबिराचे कौतुक करत आभार मानले.

Exit mobile version