पुणे : बालमजुरी आणि बाल भिक्षुकी विरुद्धच्या मोहिमेचा एक भाग म्हणून सर्व सेवा संघाच्या वतीने शनिवार वाड्याजवळील शनि मंदिर आणि श्रीमंत दगडूशेट गणपती मंदिर येथे जनजागृती करण्यात आली.
सर्व सेवा संघाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी बालमजुरी आणि बाल भिक्षुकी विरोधी जनजागृती विषयीचे फलकनागरिकांना दाखवून त्याचे वाईट परिणाम समजावून सांगितले. नागरिकांनी या मोहिमेबद्दल अधिक माहिती विचारली तरकाहींनी उपक्रमाचे कौतुक केले. सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत जनजागृती करण्यात आली.