अमरावती : बहुजन हिताय सोसायटीच्या वतीने जेवड नगर येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला. दिनांक २८, २९, आणि ३० एप्रिल या कालावधीत झालेल्या मेळाव्यात महिलांच्या शासकीय योजना, कायदे, विषयक माहिती तसेच लाभ तसेच मानसिक आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या मेळाव्याला जिल्हा विधी प्राधिकरण अमरावती, नाफेड, महिला व बाल कल्याण विभाग अमरावती, बार्टी आणि डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति रुग्णालय, संस्थांच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
बहुजन हिताय सोसायटी, मैत्री नेटवर्क भारत, आणि APPI यांचे या वेळी उपस्थित १५० हुन अधिक महिलांनी आभार व्यक्त करण्यात आले.