नवी दिल्ली : महिलांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या नागपूर येथील शितल पाटील यांना “डॉ. आंबेडकर रत्न” पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. भारतीय बौद्ध संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भन्ते संघप्रिय राहुलजी यांच्या हस्ते पाटील यांना सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भारतीय बौद्ध संघ द्वारा सामाजिक समरसता व महिला कल्याण सक्षमीकरण या विषयावर दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे राष्ट्रीय महासंम्मेलन आयोजित करण्यात आले होते.
शितल पाटील मागील अनेक वर्षांपासून महिलांच्या सशक्ती-करणासाठी तसेच महिलांच्या अधिकारांसाठी कार्यरत असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत कार्य करीत आहेत.
नागपूर येथे मित्र–मैत्रिणी व परिवारा तर्फे त्यांना या पुरस्काराबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. सुनित फुलझेले, बरखासोंगले, शामला नायडू, स्मृती राघव, शशिकला बावणे, सुनिता पाटील, वर्षा पाटील, अमित पाटील, महिमा पाटिल इत्यादींनी पाटील यांचे अभिनंदन केले.