• About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
Sunday, August 16, 2026
NGO Khabar
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग
No Result
View All Result
NGO Khabar
No Result
View All Result
Home NGO घडामोडी

स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’चा नारा देत १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

NGO Khabar by NGO Khabar
August 16, 2026
in NGO घडामोडी
0
स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’चा नारा देत १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली
302
SHARES
1.6k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्यदिनानिमित्त युवकांच्या उत्साहाने आणि एकजुटीने पिंपरी चिंचवड शहर दुमदुमून गेले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) आणि लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन  (LCF) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या १० लाईटहाऊस कौशल्य विकास केंद्रांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.


स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी, चिंचवड, निगडी, आकुर्डी, नेहरूनगर, भोसरी, किवळे, बोऱ्हाडेवाडी, चिखली आणि दापोडी या भागांमध्ये एकाच वेळी जनजागृती रॅली काढण्यात आल्या. जवळपास ४०० युवकांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला.
ध्वजारोहणानंतर सुरू झालेल्या या रॅलीमध्ये युवकांनी एकाच पोशाखात खांद्याला खांदा लावून सहभाग घेतला. “ओळख स्वतःची, जिद्द यशाची” अशा उत्साहवर्धक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. कौशल्यविकास, रोजगार, युवक सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.


रॅलीदरम्यान लाईटहाऊस चे कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी युवकांना उपलब्ध कौशल्यविकास व रोजगाराच्या संधींबाबत माहिती दिली. नागरिकांनीही रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत युवकांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले.
लाईटहाऊस कम्युनिटीज् फाउंडेशन आणि  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भागीदारीच्या कौशल्यम कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील १३,००० हून अधिक युवकांना मार्गदर्शन व प्रशिक्षणाचा लाभ मिळाला असून, त्यापैकी ६,४०० हून अधिक युवकांना रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधींशी जोडण्यात आले आहे.


स्वातंत्र्याचा उत्सव, युवकांच्या सक्षमीकरणाचा संदेश
या रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यासोबतच युवकांनी स्वतःची क्षमता ओळखावी, आवश्यक कौशल्ये आत्मसात करावीत आणि आत्मविश्वासाने स्वावलंबी भविष्य घडवावे, हा संदेश देण्यात आला.

Tags: CommunityEngagementIndependenceDay2026IndependenceDayRallyKaushalyamLighthousePCMCPimpriChinchwadSelfRelianceSkillDevelopmentSkillToSuccess
Previous Post

इंदूरमध्ये ट्रक चालकांसाठी चौथे ‘ब्रिजस्टोन सारथी सपोर्ट सेंटर’; आरोग्य आणि कल्याणासाठी स्माईल फाउंडेशनचा पुढाकार

Please login to join discussion

Categories

  • CSR (21)
  • Human Rights (46)
  • NGO घडामोडी (172)
  • Uncategorized (6)
  • Unicef News (1)
  • ब्लॉग (20)
  • सामाजिक उपक्रम (116)
  • सामाजिक कार्यकर्ता (24)
  • हिंदी (13)
NGO Khabar

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Navigate Site

  • About Us
  • Home
  • Privacy Policy
  • Terms & Conditions

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • NGO घडामोडी
  • सामाजिक उपक्रम
  • सामाजिक कार्यकर्ता
  • CSR
  • हिंदी
  • ब्लॉग

© 2021-2026 © 2026 NGO Khabar. All Rights Reserved. Empowering Social Change | News • Updates • Impact Stories

Go to mobile version